बेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले

वॉशिंग्टनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका गाडीबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी तत्काळ या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर त्यांनी या गाडीच्या जवळ स्वत:ची गाडी नेण्यात यश मिळवलं. गाडी कोण चालवतंय हे पाहून त्याला गाडी थांबवण्याची सूचना करण्यासाठी जेव्हा पोलिसांनी या गाडीच्या समांतर गाडी नेली तेव्हा ते हादरलेच कारण गाडी एक कुत्रा चालवत होता.

पोलिसांनी गाडीची नीट पाहणी केली तेव्हा कुत्र्याच्या बाजूला म्हणजेच ड्रायव्हर सीटच्या बाजूला त्यांना एक माणूस बसलेला दिसला. पोलिसांनी कशीबशी ही गाडी अडवली आणि थांबवली. जेव्हा त्यांनी आतल्या माणसाची चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की त्याचं नाव अल्बर्टो अलेजांद्रो आहे. अल्बर्टोने गंमत म्हणून त्याची गाडी कुत्र्याला चालवायला दिली. कुत्र्यानेही ती बेफामपणे चालवायला सुरुवात केली. कुत्र्याचा एक पाय अॅक्सलेटरवर होता आणि पुढचे दोन पाय स्टिअरिंग व्हीलवर होते. अल्बर्टोला जेव्हा या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा त्याने पोलिसांना सांगितलं की तो कुत्र्याला गाडी चालवायची कशी हे शिकवत होता.

आपली प्रतिक्रिया द्या