अरेच्चा! श्वान करतोय चक्क अॅरोबिक्स

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यातील काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देतात. सध्या एका श्वानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत श्वान चक्क अॅरोबिक्स करताना दिसत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून या श्वानाकडून प्रेरणा घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ अवघ्या आठ सेकंदांचा असून डॉग फॅन्स या पेजवरून शेयर करण्यात आला आहे. यात काही महिला अॅरोबिक्स करताना दिसत आहेत. त्यांच्या बरोबरीने एक श्वानदेखील अॅरोबिक्स करताना दिसतोय. या श्वानाची व्यायाम करण्याची पद्धत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या