गेटजवळ भुंकणाऱ्या कुत्र्यांना उद्योजकाने गोळ्या घालून ठार मारले, श्वानप्रेमींनी बँड-बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे शनिवारी एका कुत्र्याची अंत्ययात्रा निघाली. 26 जानेवारीला एका उद्योजकाने गेटच्या बाहेर भुंकणाऱ्या कुत्र्यांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानपूरमधील सर्वोदय नगरमध्ये गुरुवारी रात्री ज्ञानू शर्मा नावाच्या उद्योजकाने दोन कुत्र्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. यातील एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कुत्रा गंभीर जखमी झाला. गेटजवळ भुंकत असल्याने ज्ञानूने कुत्र्यांना गोळ्या घातल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी स्थानिक श्वानप्रेमी रस्त्यावर उतरले असून शुक्रवारी पोलीस स्थानकामध्ये ज्ञानू शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी कुत्र्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर श्वानप्रेमी रस्त्यावर उतरले आणि प्रदर्शन करू लागले. यावेळी श्वानप्रेमींना कुत्र्याची अंत्ययात्राही काढली. बँड-बाजा वाजवत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच #Justice या हॅशटॅगसह पोस्टरही झळकावण्यात आले.