भटक्या कुत्र्याला फरफटत नेऊन ठार मारले, तरुणाविरोधात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

भटक्या कुत्र्यास दुचाकीला बांधून फरपटत नेऊन ठार मारल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री घडली होती. बंटी फुगे (वय 25, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. हिना सलीम नायकुडे (वय 27, रा. द्वारका राजपार्क, पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. 6) याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी बंटी फुगे यांने कासारवाडी परिसरात भटकत असलेल्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधली आणि त्याला दुचाकीच्या पाठीमागे बांधून स्मशानभूमीपासून ते किनारा हॉटेलपर्यंत फरफटत नेले. जखमी झालेल्या कुत्र्याचा अखेर मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या