मालकिणीच्या तोंडात कुत्र्याने केली ‘शी’, परिणाम झाला भयंकर

लोकं त्यांनी घरी पाळलेल्या प्राण्यावर अत्यंत प्रेम करतात. जेवणे, झोपणे याशिवाय घरात पाळलेला हा प्राणी त्यांच्या प्रत्येक कामाच्या वेळी त्यांच्यासोबत हजर असतो, मात्र जेव्हा हे प्राणी आजारी पडतात तेव्हा त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्यांचा आजार मालकालाही जडण्याची शक्यता असते. इंग्लंडमध्ये एका महिलेच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे.

डेली स्टार वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, 51 वर्षीय अमेंडा गोमो ही महिला इंग्लंडमधील ब्रिसल येथे तिच्या 3 मुलांसह राहते. तिच्या मुलीने घरात चुवावा प्रजातीचा कुत्रा घरात पाळला आहे. याचे नाव ‘बेले’ आहे. या प्रजातीचे कुत्रे शरीराने अतिशय छोटे असतात.

एके दिवशी अमेंडा त्याला तिच्या हातावर घेऊन झोपली होती. झोपेत तिचे तोंड उघडे राहिले होते. काही वेळानंतर झोपेतच तिच्या लक्षात आले की, तिच्या तोंडात काहीतरी ओलसर पदार्थ लागत आहे. अशी जाणीव होताक्षणी ती झोपेतून खाडकन् जागी झाली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिच्या कुत्र्याने तिच्या तोंडातच ‘शी’ केली आहे.

हे लक्षात येताच ती वेगाने बाथरूमच्या दिशेने धावू लागली, मात्र नेमका त्याचवेळी तिचा मुलगा अंघोळ करत होता. त्यामुळे तिला तोंड धुण्यासाठी काही वेळ लागला. तोपर्यंत तिच्या तोंडातील मैला तिच्या पोटापर्यंत गेला होता. तिने बऱ्याच वेळा तोंड धुतले, ब्रश केले. तरीही तिच्या तोंडाला येणारा दुर्गंध आणि घाणेरडी चव जात नव्हती. त्यानंतर तिची मुलगी तात्काळ बेलेला घेऊन डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विषाणुंचा संसर्ग झाला असल्याचे सांगून अँण्टिबायोटिक औषधे दिली.

या घटनेनंतर मालकीण अमेंडामध्येही कुत्र्यासारखीच लक्षणे जाणवत होती. तात्काळ तिचे पोट बिघडले आणि तिला जुलाबाचा त्रासही जाणवू लागला. त्यामुळे तिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे लागले, मात्र तिला मोठ्या प्रमाणात झालेल्या संसर्गामुळे रुग्णवाहितून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे तिला 3 महिने उपचार घ्यावे लागले, कुत्र्याने तोंडात केलेल्या पॉटीमुळे गॅस्ट्रोची लागण होऊन तिला आतड्यांचा संसर्ग झाला होता. कुत्र्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली तसेच आजारी कुत्र्याला स्वत:च्याच बेडवर झोपवल्यामुळे तिला या परिणामाला सामोरे जावे लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.