पाकिस्तानवरील विजयानंतर विराट रंगला बालपणात, भन्नाट फोटो केला शेअर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये क्रिकेटचे महाद्वंद्व पाहायला मिळाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यातील सामना मॅनचेस्टरमध्ये रंगला. या लढतीत विराटसेनेने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधातील विजयाची परंपरा कायम राखली. हिंदुस्थानने पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला. पाकिस्तानला सातवे आसमान दाखवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.

टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वर बाहेर
विराटच्या शिवीमुळे मी बदनाम झालोय, स्टोक्सची ट्विटर बंद करण्याची धमकी

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतमध्ये क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा एक कंबरेवर हात ठेवलेला फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवर अनेक मीम्सही बनले होते. परंतु या मीम्सची चिंता न करत विराटने ‘हे तर मी नव्वदच्या दशकातही करत होतो’, असे कॅप्शन देऊन लहानपणचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

रविवारी मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रफॉर्ड मैदानावर झालेल्या लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्डकपमधील पाकिस्तानवरील हा टीम इंडियाचा सातवा विजय ठरला. टीम इंडियाकडून सलामीवीर रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावांची धमाकेदार खेळी केली. रोहितला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.