सातजणांना लाखोंचा ‘ऑनलाइन’ चुना

सामना ऑनलाईन । डोंबिवली

बँकेतून बोलत असल्याचे सांगून खातेदारांच्या कार्डची माहिती मिळवून सातजणांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला. ठाकुर्ली येथील अश्विन पटेल यांना एका अज्ञात इसमाने फोनवरून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली. काही दिवसात त्यांच्या खात्यातून तब्बल ५७ हजार-पाचशे रुपयांचा अपहार केला. हीच कार्यपद्धती वापरून येथील आणखी सहाजणांची फसकणूक करून त्यांच्या खात्यातील एकूण दीड लाख रुपये चोरण्यात आले.