डॉमिनोज पिझ्झा बंद होणार?

1176

हिंदुस्थानात पिझ्झा हा इटालियन पदार्थ प्रसिद्ध करण्यात डॉमिनोज पिझ्झा या कंपनीचा मोठा हात आहे. अवघ्या पन्नास रुपयांत सर्व सामान्यांपर्यंत पिझ्झा पोहचवणारी ही कंपनी हिंदुस्थानातील सध्याची सर्वात आघाडीची पिझ्झा कंपनी आहे. संपूर्ण देशभरात याचे आऊटलेट्स आहेचत. मात्र हाच प्रसिद्ध ब्रँड सध्या अडचणीत आला आहे.

जगभरात मंदिचा फटका बऱ्याच देशांना बसला असून त्यामुळे बरेच व्यवसाय तोट्यात चालले आहेत.या मंदिचा फटका सुप्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला देखील बसला आहे. मंदिमुळे डॉमिनोज पिझ्झाला मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचे समोर आले आहे.

 त्यामुळे या कंपनीने चार देशातील त्यांचे सर्व आऊटलेट बंद केले आहेत. यात स्वीडन, स्वित्झरलँड, आईसलँड, नॉ़र्वे या चार देशांमध्ये डॉमिनोज पूर्ण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानात देखील मंदिचा फटका डॉमिनोजला बसणार का? हिंदुस्थानातील डॉमिनोज देखील बंद होणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या