कुठल्याही बातमीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, अभिनेत्रीचे आवाहन

1863

खंडणी उकळण्याच्या आरोपावरून मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा श्रवण हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर सारा श्रवणने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. कुठल्याही बातम्यांवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका असे आवाहन साराने केले आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये साराने म्हटले आहे की,गेल्या काही दिवसांत माझ्याबाबतीत ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या आहेत त्याची खातरजमा न करता प्रतिक्रिया देऊ नका, त्यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास होतो. मी माझ्या घरी सुखरूप आहे. मी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी आजही खंबीरपणे उभी आहे. जे काही खरे खोटे असेल ते न्यायालयाच्या निर्णयातून कळेल. त्यापूर्वी कुठल्याही माहितीची खातरजमा न करता प्रतिक्रिया देऊ नका, कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असेही साराने यावेळी म्हटले आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका नवोदीत कलाकाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी मराठी अभिनेत्री सारा श्रवण हिला अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री मुंबईमधून साराला अटक केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरुपात मोडत असल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला आहे. परंतु आज आपण आपल्या घरी सुखरुप असल्याचे सारा श्रवणने फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या