WHO ला लाज वाटली पाहिजे! भडकलेल्या ट्रम्प यांची चीनसह आरोग्य संघटनेवरही पुन्हा टीका

6503

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चीनवर भलतेच संतापलेले आहेत. जगभरात पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचे उगम हे वुहान असून चीनने हा विषाणू त्यांच्या प्रयोगशाळेत बनवला असल्याचा ट्रम्प यांचा आधीपासूनच आरोप आहे. अशा चीनसाठी जागतिक आरोग्य संघटना ही जनसंपर्क संस्थेसारखी वागत असून त्यांना लाज वाटायला पाहिजे अशी आगपाखड ट्रम्प यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी चीनवर तिखट शब्दात टीका करणं सातत्याने सुरू ठेवलं आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा चीनवर आरोप केला ज्यात त्यांनी म्हटलंय की अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना हरवण्यासाठी चीन काहीही करू शकतं. ज्या पद्धतीने चीनने या विषाणूपासून सुटका करून घेतली त्यावर ही बाब सिद्ध होत असल्याचंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

मी बरंच काही करू शकतो!
ट्रम्प यांनी रॉयटर्सला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की या विषाणूमुळे पेचिंगला कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल याबाबत विचार सुरू आहे. ट्रम्प यांनी ते काय करणार आहेत याबाबत माहिती दिली नाही मात्र ते म्हणाले की ‘मी बरंच काही करू शकतो.’ पेचिंगने या विषाणूबाबात जगाला लवकरात लवकर माहिती द्यायला हवी. ट्रम्प यांनी या आजाराच्या उद्रेकाचा संबंध अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीशी जोडला आहे. त्यांनी म्हटलंय की चीन त्यांना हरवण्यासाठी काहीही करू शकतो

चीनला निवडणुकीत जो बिडेन यांना जिंकवायचे आहे
ट्रम्प यांनी आरोप केला आहे की चीनला निवडणुकीमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांना जिंकवायचं आहे. असं केल्याने चीन आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमुळे आलेला तणाव कमी होऊ शकेल. चीनचे अधिकारी हे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सातत्याने जनसंपर्काचा प्रयत्न करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या