ट्रम्प म्हणाले होते, सत्तेत आल्यास मोदींसारखे काम करू; मुख्यमंत्री योगींचा दावा

2

सामना ऑनलाईन । लखनौ

2016 साली डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की आपण जर निवडून आलो तर मोदींसारखे काम करू, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा मध्ये ते बोलत होते.

योगी म्हणाले की, “आज जगात कुठेही निवडणुका असुदे, तिथे हिंदुस्थान आणि मोदींचा मुद्दा असतोच. 2016 मध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, जर मी निवडून आलो तर हिंदुस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी जसे विकासकामे केली तशीच कामे मी अमेरिकेत करेन.”

ही माहिती व्हॉट्सऍपवर आली होती, असे नेटकर्‍यांनी म्हटले आहे. तसेच यासाठीच व्हॉट्सऍपवर बंदी आणली पाहिजे अशी उपहासात्मक टोलाही काही नेटकर्‍यांनी लावला आहे.