ट्रम्प यांनी अज्ञानाची ‘सीमा’ ओलांडली, हिंदुस्थान-चीन शेजारी राष्ट्रे हे माहितीच नाही

1143
donald-trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वादग्रस्त आणि बेताल विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील माध्यमे त्यांना अनेकदा त्यासाठी झोडपून काढत असतात आणि ट्रम्प हे त्यांच्यावर आगपाखड करत असतात. मात्र ट्रम्प यांची आणखी एक बाजू समोर आली असून ज्यातून त्यांचं भौगोलिक अज्ञानही उघड झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची बैठत होती. या बैठकीमध्ये त्यांनी म्हटले की तुमची सीमा ही चीनला लागून नाहीच आहे. त्यांचं हे अज्ञान पाहून मोदीही हैराण झाले आणि ही बैठक सोडून ते निघूनच गेले.

अमेरिकेतील दोन पत्रकारांनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचं नाव A Very Stable Genius: Donald J.Trump’s Testing of America असं आहे. या पुस्तकात लेखकांनी ट्रम्प यांची कारकीर्द कशी होती, याचा आढावा घेतला आहे. या पुस्तकात असे अनेक किस्से आहेत जे आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. हिंदुस्थान-चीन सीमेबाबतचा किस्साही त्यातलाच एक आहे.

मोदी हे ट्रम्प यांच्या अज्ञानामुळे हैराण झाले होते. हिंदुस्थान आणि चीनमध्ये 2500 मैलांची सीमारेषा आहे. ही सीमा अमेरिका आणि मेक्सिकोपेक्षाही मोठी आहे. पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय की ट्रम्प यांचं अज्ञान पाहून आणि ऐकून मोदी ‘या माणसावर विश्वास ठेवणं कठीण आहे’ असं म्हणाले आणि बैठकीतून निघून गेले. ट्रम्प यांचं आशिया खंडातील देशांबाबतचं अज्ञान हे नवी गोष्ट नाहीये. यापूर्वी त्यांनी नेपाळला निप्पल म्हटलं होतं तर भूतानला बटन म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यांना हे दोन्ही देश हे हिंदुस्थानचाच भाग असल्याचाही वाटत होते.

आपली प्रतिक्रिया द्या