मी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी हिंदुस्थानी जमणार, ट्रम्प यांचा अमेरिकेत दावा

1868
trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येताना ट्रम्प यांचा उत्साह चांगलाच पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील एका सभेत बोलताना त्यांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी 1 कोटी लोक येणार असल्याचा दावा केला आहे. याआधी त्यांनी कधी 50 लाख तर कधी 70 लाख लोक स्वागतासाठी येणार असल्याचे दावे केले होते.

अमेरिकेतील कोलराडो येथील सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, ‘… मी ऐकले आहे की तिथे 1 कोटी लोक स्टेडिअमपर्यंत माझ्या स्वागतासाठी उभे असणार आहेत. ही संख्या 60 लाख ते 1 कोटी असू शकेल.’

बोलता बोलता त्यांनी सव्वत:ची तुलना बीटल्स सोबत केली. ते म्हणाले की, माझ्यासाठी इतकी गर्दी जमणार आहे की बीटल्ससारखा प्रसिद्ध झालो आहे. इतकी गर्दी असेल की स्टेडिअम गच्च भरलेले असेलच पण अनेक लोक स्टेडिअम बाहेर उभे रहावे लागेल.

दरम्यान, अमेरिकेत हाउडी मोदी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी 50 हजार लोक या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या