नेटकऱ्यांमध्ये रंगली ट्रम्प यांच्या ‘लिंबू कलरचा टाय’ची चर्चा

1035

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थान दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. अहमदाबाद येथील विमानतळावर त्यांचं विमान दाखल झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. त्यानंतर ट्रम्प यांचा दौरा सुरू झाला. ट्रम्प यांच्या दौऱ्याची जितकी उत्सुकता आणि चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली होती, तितकीच चर्चा ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका यांच्या पोशाखांचीही रंगली आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काळ्या रंगाचा टक्सिडो सूट परिधान केला असून त्याच्यावर त्यांनी लिंबू रंगाचा टाय घातला होता. खरंतर औपचारिक पोशाखांमध्ये शक्यतो ब्राईट रंगाचे कपडे परिधान करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या लिंबू कलरच्या टायची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली. पण, पाश्चात्य देशांमध्ये लिंबू रंग किंवा इंग्रजीत लेमन यलो हा रंग आशेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ट्रम्प यांना हिंदुस्थानकडून आशा असल्याचं दर्शवण्यासाठी ट्रम्प यांनी असा पोशाख केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

donald-melania-india

ट्रम्प यांची पत्नी मेलानिया हिनेही ऑफ व्हाईट रंगाचा जम्पसूट परिधान केला आहे. त्यावर हिरव्या रंगाचा कापडी बेल्टही त्यांनी बांधला आहे. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने लाल फुलांची नक्षी असलेला पोशाख परिधान केला आहे. या तिघांच्याही पोशाखांची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या