सत्ता हस्तांतरण करेन, पण बायडेन यांच्याकडून पराभव झाल्याचे अमान्य

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे मी सोपवेन. पण यापुढेही निवडणुकीतील माझ्या पराभवासाठी करण्यात आलेल्या घोटाळ्यांविरोधात माझी लढाईच सुरू राहील, असे सांगत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतला आपला पराभव मान्य करण्यास पुन्हा नकार दिला आहे. मला बायडेन यांनी नाही तर निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्यांनी पराभूत केले आहे. पण माझा लढा मी पुढेही सुरूच ठेवेन आणि अंतिम विजय माझाच असेल, असेही प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी मंगळवारी बायडेन यांना गुप्तचरांच्या प्रमुख कारवायांची गुप्त माहिती देण्यास मंजुरी देणाऱया पत्रावर सहीही केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या