हिंदुस्थानातील ‘या’ शहरांमध्ये पसरला आहे ट्रम्प यांचा व्यापार!

1389

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱ्याची उलटगणना सुरू झाली आहे. ट्रम्प रविवारी हिंदुस्थान दौऱ्यासाठी अमेरिकेहून निघणार आहेत. ट्रम्प या दौऱ्यासाठी खूप उत्सुक आहेत. अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी ट्रम्प आणि मोदी यांचे पोस्टर झळकत आहेत. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असले तरी ते प्रसिद्ध उद्योगपतीही आहेत. त्यांचा व्यापार हिंदुस्थानातील काही शहरात पसरला आहे. त्यांनी हिंदुस्थानात मोठी गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील मैत्री दृढ होण्यासोबतच ट्रम्प यांच्या व्यापाऱ्याच्या दृष्टीनेही या दौऱ्याकडे बघण्यात येत आहे.

देशातील मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता या शहरात ट्रम्प यांचा व्यापार पसरला आहे. ट्रम्प पहिल्यांदाच हिंदुस्थानात येत असले तरी त्यांचे हिंदुस्थानाशी जुने नाते आहे. तसेच त्यांचे काही कटुंबीय व्यापारासंदर्भात हिंदुस्थानात आले आहेत. पुण्यातील ट्रम्प टॉवरच्या दुसऱ्या इमारतीच्या उद्घाटनाला 2018 मध्ये ट्रम्प यांचा पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आले होते. हिंदुस्थानात रिअल इस्टेट क्षेत्रात ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच अनेक प्रकल्पातही त्यांनी पैसा गुंतवला आहे. देशातील अनेक शहरात ट्रम्प टॉवर उभे राहिले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राच उत्तर अमेरिकेनंतर ट्रम्प यांनी हिंदुस्थानात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील ट्रम्प यांचा व्यापार ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ चा भाग आहे. ट्रम्प यांच्या नावावर सुमारे 250 कंपन्या आहेत. तर 500 विभाग ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ चा भाग आहेत. या सर्वांचे मालकी हक्क ट्रम्प यांच्याकडे आहेत. ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ ची सुरुवात ट्रम्प यांची आजी एलिजाबेथ क्राअस्ट ट्रम्प आणि ट्रम्प यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांनी केली होती. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न 5 हजार केटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ट्रम्प यांच्या कंपनीने 2013 मध्ये हिंदुस्थानात पदार्पण केले. तेव्हापासून 7 वर्षात ट्रम्प यांचा व्यापार देशातील अनेक शहरात पसरला आहे. त्यांच्या कंपनीने हिंदुस्थानी कंपन्याच्या मदतीने अनेक सुविधायुक्त निवासी संकुले उभारली आहेत. ट्रम्प यांची कंपनी लोढा, पंचशील रियल्टी, एम 3एम, ट्रिबेका, यूनिमार्क आणि आयरिको या कंपन्याच्या मदतीने देशभरात रियल इस्टेट क्षेत्रात अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. या कंपन्यासोबत ट्रम्प यांच्या कंपनीचे नाव जोडले गेल्याने या कंपन्याची मागणीही वाढली आहे. तसेच या कंपन्यांनी उभआरलेल्या निवासी संकुलांनाही चांगली मागणी आहे. पंचशील रियल्ट्रीसोबत ट्रम्प यांच्या कंपनीने पुण्यात 23 माळ्यांचे दोन ट्रम्प टॉवर उभे केले आहेत. यातील एका फ्लॅटची किंमत 15 कोटींच्यावर आहे. तसेच मुंबईतील वरळीमध्येही 700 एकरच्या परिसरात ट्रम्प टॉवर उभे राहत आहेत. त्यात 78 माळे असणार आहेत. लोढा ग्रुपच्या सहकार्याने हे टॉवर उभे राहत आहेत. या इमारतीत खासगी जेट सुविधा आणि ट्रम्प कार्ड मिळणार आहेत. कोलकातामध्येही यूनिमार्क ग्रुप, आरडीबी ग्रुप आणि ट्रबेकाच्या मदतीने 39 माळ्यांचा ट्रम्प टॉवर उभआ राहत आहेत. गुरुग्राममध्येही 50 माळ्यांचे दोन ट्रम्प टॉवर उभे राहणार आहेत. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीनेही ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या