बगदादीनंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्याचाही खात्मा – डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

1152

इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र-अल-बगदादीचा दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने खात्मा केला होता. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्यालाही अमेरिकन सैन्याने ठार केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची माहिती दिली. बगदादीनंतर अब्दुल्लाह कार्दश इसिसचे नेतृत्व स्विकारणार होता. तो बगदादीचा प्रथम क्रमाकांचा उत्तराधिकारी मानला जात होता. बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा अमेरिकन सैन्याने खात्मा केल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी खात्मा केलेल्या दहशतवाद्याचे नाव सांगितले नाही. मात्र, तो कार्दशच असल्याचे मानले जात आहे.

अबु बक्र-अल-बगदादीचा क्रमांक एकचा उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या अब्दुल्लाह कार्दश या दहशतवाद्याचाही अमेरिकन सैन्याने खात्मा केला आहे. बगदादीनंतर तोच इसिसचे नेतृत्व करणार होता. मात्र, त्याचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले आहे. बगदादीसह त्याच्या तीन मुलांचा खात्मा झाल्यानंतर त्याच्या उत्तराधिऱ्यांवरही आमची नजर आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. शनिवारी रात्री अमेरिकन सैन्याने बगदादीसह त्याच्या तीन मुलांना घेरल्यानंतर त्याने जॅकेटचा स्फोट घडवला होता. त्यात त्याच्यासह त्याच्या तीन मुलांचाही खात्मा झाला, अशी माहिती ट्रम्प यांनी रविवारी दिली होती. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी हमजाचाही खात्मा करण्यात आला. त्याचप्रमाणे बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचाही खात्मा करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसात बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बगदादी काही दिवसांपासून अस्वस्थ होता. अनेक रोगांनी त्याला ग्रासले होते. त्यामुळे संघटनेची सर्व जबाबदारी कार्दश सांभाळत होता. त्यामुळे तोच बगदादीचा उत्तराधिकारी मानण्यात येत होता. इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैनसाठी कार्दश काम करत होता. त्यानंतर तो इसिसमध्ये आला होता. तो कोणत्याही कारवाईत सहभागी होत नसून फक्त आदेश देण्याचे काम करत होता. संघटना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.आता त्याचाही खात्मा करण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या