माझ्या मुलाने 15 मिनिटांत कोरोनावर मात केली; ट्रम्प यांचा अजब दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाने 15 मिनिटांत कोरोनावर मात केली असल्याचा अजब दावा केला आहे. 15 मिनिटांत कोरोना विषाणू नष्ट झाले होते, असे ते म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पेन्सिल्व्हेनिया येथील मार्टिन्सबर्ग येथे आयोजित प्रचारसभेत बोलत असताना हा दावा केला. ‘डेली मेल’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. यासंबंधी यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला 14 वर्षीय मुलगा बॅरन यालाही कोरोना झाला असल्याची माहिती दिली. त्यांनी बॅरन तरुण असून रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याचा उल्लेख केला. मी डॉक्टरांना बॅरनच्या प्रपृतीविषयी विचारले असता त्यांनी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. 15 मिनिटांनी पुन्हा जेव्हा मी डॉक्टरांना बॅरनच्या प्रपृतीविषयी विचारले तेव्हा त्यांनी कोरोना निघून गेला असे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आपली प्रतिक्रिया द्या