दहशतवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा- ट्रम्प

46

सामना ऑनलाईन । वॉशिग्टन

अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आसूड ओढला आहे. हिंदुस्थानसोबत असलेले मैत्रीचं नातं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी सोमवारी फोर्ट मायर येथे अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलतांना, दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तानचा ट्रम्प यांनी चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला पाठिशी घातलं आहे. अमेरिकेने घोषित केलेल्या २० दहशतवादी संघटना पाकिस्तान आणि अफगाणिस्थानमध्ये सक्रिय आहेत. पाकिस्तानात दहशतवादी कारवाया अशाच सुरू राहिल्या तर अमेरिका यापुढे शांत बसणार नाही आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा दम ट्रम यांनी पाकिस्तानला दिला. याशिवाय हिंदुस्थानशी असलेलं नातंही अधिक घट्ट करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले. तसेच हिंदुस्थानने अफगाणिस्थानमध्ये अमेरिकेला मदत करायला हवी अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या