अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांशी झालेल्या अभूतपूर्व झटापटीत महिलेचा मृत्यू

बुधवारी अमेरिकेच्या संसदेत जो बायडेन यांना अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात येणार होते. मात्र त्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून मोठा गोंधळ केला. या समर्थकांनी संसदेत तोडफोड केली व पोलिसांवर रासायनिक द्रव्ये फेकली. तसेच दोन समर्थकांकडून स्फोटके देखील जप्त करण्यात आली आहेत. यावेळी समर्थक पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. या ट्रम्प समर्थकांसोबत रिपब्लिकन पक्षाचा एक खासदार देखील होता असे बोलले जात आहे.

दिशाभूल करणाऱ्या विधानांमुळे फेसबुक, ट्विटरने डोनाल्ड ट्रंप यांचे खाते तात्पुरते बंद केले

अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असला तरी ते अद्याप हा पराभव मान्य करायला तयार नाहीत. जो बिडेन यांना बुधवारी संसदेत अधिकृतरित्या विजयी करण्यात येणार होते. मात्र त्याच्या काही तास आधी ट्रम्प समर्थकांनी संसदेत मोठ्या प्रमाणात तोड फोड केली. हे समर्थक पोलिसांनाही जुमानत नव्हते. वाटेल त्या मार्गाने ते संसदेत घुसत होते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी पोलीस व समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वॉशिंग्टन शहरात कर्फ्यू लागू केला आहे. या गोंधळानंतर ट्विटर, फेसबुकने काही काळासाठी ट्रम्प यांना ब्लॉक करत कायमस्वरुपी बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.

या गोंधळाच्या काही तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित करताना या निवडणूकीत घोटाळा झाल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या