अमेरिकेत सर्वाधिक वेगाने कोरोनाग्रस्त का वाढत आहेत, ट्रम्प यांचं ट्विटर वरून उत्तर

1295

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शाब्दिक हल्ले करणे चालूच ठेवले आहेत. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरसला ‘चिनी व्हायरस’ म्हटले. अमेरिकन अध्यक्ष म्हणाले की आम्ही मोठ्या प्रमाणात चाचण्या घेत आहोत, त्यामुळे कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की येथे मृत्यूच्या संख्येत आता घट होत आहे. फेकन्यूज दाखवणाऱ्यांनी या बातम्या देखील दाखवाव्यात.

तसेच रोजगाराच्या संदर्भात त्यांनी दावा केला आहे की अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना आता विक्रमी वेगाने नोकऱ्या मिळू लागल्या आहेत.

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. येथे दररोज सुमारे पन्नास हजार नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ नोंदवली जात आहे.

वर्ल्डमिटरच्यानुसार अमेरिकेत आतापर्यंत 29 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1.32 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आता अमेरिकेत मृत्यूदर दररोज पाचशेच्या जवळपास पोहोचला आहे, तर या आधी दररोज तेथे मृत्यूचे प्रमाण चार हजार इतके होते.

आपली प्रतिक्रिया द्या