गरिबीतून आलेल्या मोदींना गरिबीची लाज का? काँग्रेसचा सवाल

528

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीकेळी तिथली गरिबी दिसू नये म्हणून मोठी भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गरिबीतून पुढे आल्याचे अनेकदा सांगत असतात मग आता त्यांना गरिबीची एवढी लाज का वाटावी, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

अहमदाबादमधील गरिबांच्या झोपडय़ा ट्रम्प यांना दिसू नयेत यासाठी चालकलेला खटाटोप अत्यंत निंदनीय क लाजिरकाणा आहे. अमेरिकेतही गरिबी आहेच मग हिंदुस्थानातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे. परंतु आपण विकासपुरुष असल्याचा आव आणून बवाल शहर व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजप सरकारकडून केला जाणारा हा प्रकार घृणास्पद आहे. मोदी सरकारच्या या अमानवी कृत्याचा काँग्रेस जाहीर निषेध करत, असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. गुजरात विकासाचे मॉडेल सपशेल खोटे असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या