बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनास २५ लाखांची देणगी

20

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या विस्तारीकरण कामासाठी वैशिष्ट्यपुर्ण निधीतून २५ लाख रुपये निधीला मंजुरी दिली असल्याची घोषणा, नवनियुक्त पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत करताच पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.

विशेष म्हणजे बुलढाणा येथे भाऊसाहेब फुंडकर यांनी २७ मे २०१७ रोजी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकार भवनाला निधी देण्याचे सुतोवाच केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या