शालेय शुल्क रचनेत बदल नको! मेस्टा शिक्षक संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील पालक आणि शाळा प्रशासनामध्ये शालेय शुल्काच्या मुद्दय़ावरून वाद सुरू असतानाच राज्यातील खासगी शाळांच्या फी रचनेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नका, अशी मागणी आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोशिएशन आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनतर्फे ही मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. शाळांच्या फी रचनेत बदल झाल्यास त्याचा फटका सुमारे 6 लाख शिक्षकांना बसेल, अशी भीतीदेखील याकेळी व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईनरीत्या सुरू होत्या. त्यामुळे शालेय शुल्कात कपात करावी, अशी मागणी अनेक पालकांकडून जोर धरू लागली होती. याप्रश्नी न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे. त्यामुळे शिक्षण शुल्क रचनेत बदल करण्याचे संकेत काही दिकसांपूर्वी शिक्षण खात्याकडून देण्यात आले होते. त्यामुळे याविरोधात आता शिक्षकांनी बंड पुकारले असून त्यांनी थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदन देत शुल्क रचनेत कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली आहे.

काय आहेत इतर मागण्या

  • शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना किमान केतन द्या
  • मागील चार वर्षांपासून आरटीई थकबाकी जारी करा
  • शैक्षणिक वर्षे 2020-21 साठी शासकीय कर आणि वीज शुल्क माफ करा
  • राज्य सरकारद्वारे तयार करण्यात येणाऱ्या नियामक समितीमध्ये मेस्टा सदस्यांना प्रतिनिधित्व द्यावे
आपली प्रतिक्रिया द्या