‘कोहलीला शिव्या दिल्यात तर भारी पडेल’

52

सामना ऑनलाईन, मेलबॉर्न

प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना डिवचण्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा नंबर फार वरचा आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजाने विराट कोहलीबाबत असं करू नका असा सल्ला दिलाय. कोहलीला डिवचलंत त्याला शिव्या दिल्यात तर महागात पडेल असं मायकल हसी याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सांगितलंय. जर असं केलं तर विराट कोहली अजून पेटून उठेल आणि मग त्याला आवरण कठीण जाईल असं हसीने म्हटलंय.

hussy

हसी हा हिंदुस्थानच्या धरतीवर सगळ्यात जास्त धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आहे. त्याला डीवचण्याऐवजी कोहलीला स्वस्तात बाद करण्यावर भर द्यायला हवा असं हसीने म्हटलंय. २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थानी संघामध्ये कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. कोहलीला मैदानात त्याच्याशी वाद घातलेला आवडतो, मैदानातील चुरस वाढली की त्याचा खेळ बहरत जातो असं हसीने म्हटलंय.

२०१४मध्ये जेव्हा हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता तेव्हा एमसीजी मैदानामध्ये कोहलीला डीवचण्यात आलं होतं त्यानंतर कोहलीने त्याची कसोटी सामन्यातील सर्वौत्तम कामगिरी करत १६९ धावांची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीमुळे सामना अनिर्णित राहीला होता. अॅडलेड कसोटीमध्येही कोहली आणि स्मिथमध्ये चकमक झाली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ मैदानातून समालोचन करत होता, ज्याला कोहलीने हरकत घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या