जीएसटी भरू नका; मोदी तुमच्या दारात येतील! मोदींच्या भावाचा व्यापाऱ्यांना सल्ला

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे पंबरडे मोडले आहे. आता एकीचे बळ दाखवून जीएसटी भरण्यास नकार द्या. आंदोलन उभे करा, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तुमच्या दारात येतील, असा सल्ला नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरातील व्यापाऱ्यांना दिला.

उल्हासनगर ट्रेडर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमासाठी प्रल्हाद मोदी उल्हासनगरात आले होते, यावेळी ते बोलत होते. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणतात.पण चहा विकणे हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. आमच्या वडिलांनी चहा विकला. त्यानंतर आम्ही पाचही भाऊ चहा विकत होतो. त्यामुळे आम्हाला चहावाला म्हणण्याऐवजी ‘चहावाल्याची मुले’ असा उल्लेख करा, असेही प्रल्हाद मोदी म्हणाले. चहा आम्ही सगळय़ांनीच विकला, पण ज्याचा मुकुट मोठा त्यालाच पत्रकार चालवतात, असे चिमटेही प्रल्हाद मोदी यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या