आगीशी का खेळता?

133

अयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्षे करीत आहेत. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराठ्र यांना धनदांडग्यांच्या घशात घालायचाच आहे व त्यासाठी मुख्यमंत्री खंडोजी खोपडे व सूर्याजी पिसाळांच्या मदतीने शिवसेनेवर घाणेरडी टीका करणार असतील तर आज फक्त घसाच बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल. शिवसेना म्हणजे महाराठ्र अस्मितेचा पेटलेला अंगार आहे. आगीशी खेळू नका!

आगीशी का खेळता?

शिवसेनेवर टीका करताना महाराठ्राच्या मुख्यमंत्र्यांचा घसा बसला हे काही बरे झाले नाही. महानगरपालिका निवडणुकांत `भाजप’ बसेलच, पण त्याआधीच यांचे घसे बसू लागले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तब्येतीस सांभाळायला हवे. अखंड महाराठ्राची जबाबदारी जोपर्यंत त्यांच्यावर आहे तोपर्यंत त्यांना ती उत्तम प्रकारे सांभाळावीच लागेल. त्यांनी अधूनमधून हळद टाकून गरम दूध प्यावे. त्यामुळे घशाला शेक बसून थोडा आराम पडेल. गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून प्राशन केल्यासही त्यांच्या घशाला आराम पडू शकतो. भारतीय जनता पक्षाचे श्री. रामदेवबाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डची काही औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्या औषधांचा बटवा त्यांनी जवळ बाळगावा हेच बरे. निवडणुकांत ज्यांची `नरडी’ जास्त गरमागरम होतात व टिकतात त्यांचे बरे चालते. त्यांना मुंबईसह दहा महानगरपालिका हद्दीत प्रचारासाठी घसा फोडायचा आहे. घसा फोडायचा म्हणजे शिवसेनेच्या नावाने शंख करायचा आहे. शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष, खंडण्या घेणाऱयांचा पक्ष असा सूर लावताना त्यांचा घसा पुन्हा बिघडला तर कसे व्हायचे? म्हणूनच

मुख्यमंत्र्यांनी जे पचेल तेच

बोलावे. शिवसेना म्हणजे आगीचा लोळ आहे. टीका करणाऱयांची जीभ जाळून टाकेल. आम्ही शिवसेनेच्या माध्यमांतून मुंबईत जोरदार काम केले आहे. शिवसेनेचे काम हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला कलानी – भोसल्यांसारख्या गुंडापुंडांची, खंडणीखोरांची कवचकुंडले लागत नाहीत. ज्या पक्षाचा राठ्रीय अध्यक्ष टीव्ही कॅमेऱयांसमोर खंडणी घेताना पकडला गेला त्या पक्षाच्या लोकांनी शिवसेनेवर हे असले घाणेरडे आरोप करावेत हा विनोदच आहे. उत्तर प्रदेश व गोव्यासारख्या राज्यांत तर गुंड आणि भ्रष्ट लोकांना प्रवेश देण्यासाठी फडणवीस यांच्या पक्षाने विशेष खिडकीच उघडली आहे आणि महाराठ्रात अशा गुंडांसाठी दरवाजे सताड उघडे ठेवून हे लोक बसले आहेत. बलात्कार, खून, लफंगेगिरी, चोऱया व भ्रष्टाचार केल्याचे `दाखले’ दाखवा व पक्षात प्रवेश घेऊन पद मिळवा असे जे `पॅकेज’ भाजप मंडळींनी जाहीर केले आहे ते कोणत्या चारित्र्यात व साधनशूचितेत बसते? शिवसेना गुंड असेल तर मग बाबरीच्या लढय़ात राममंदिरासाठी जे कोठारी बंधू व शिवसेनेचे अनेक कारसेवक शहीद झाले ते सध्या फडणवीस यांच्या व्याख्येत

गुंड व खंडणीखोरच

म्हणायचे काय? 1992 च्या दंगलीत मुंबई वाचवून हिंदू आयाबहिणींचे रक्षण करणारे अनेक शिवसैनिक मारले गेले व काँठोजी दमनशाहीचे बळी ठरले, त्यांनाही एकदा गुंड ठरवून मोकळे व्हा! ज्यांच्या अंगावर देश, धर्म व महाराठ्रासाठी कधी साधा ओरखडा उठला नाही असे लोक नशिबाने सत्ताधारी होतात व देशभक्त, महाराठ्रधर्मीयांना चोर ठरवतात. अर्थात या `चोरां’नीच महाराठ्रास स्वाभिमानाचे तेज दिले हे ध्यानात ठेवा. शिवाजी महाराजांनाही लुटारू ठरविणारी अवलाद या भूमीत निपजली म्हणून शिवरायांचे तेज कमी झाले नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. हा त्याग फक्त शिवसेनाच करू शकते. राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्षे करीत आहेत. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराठ्र यांना धनदांडग्यांच्या घशात घालायचाच आहे व त्यासाठी मुख्यमंत्री खंडोजी खोपडे व सूर्याजी पिसाळांच्या मदतीने शिवसेनेवर घाणेरडी टीका करणार असतील तर आज फक्त घसाच बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल. शिवसेना म्हणजे महाराठ्र अस्मितेचा पेटलेला अंगार आहे. आगीशी खेळू नका!

आपली प्रतिक्रिया द्या