‘या’ गोष्टी मोबाईलमध्ये चुकूनही सेव्ह करू नका

49

सामना ऑनलाईन । मुंबई

मोबाईल सध्याच्या काळाची गरज असल्याने प्रत्येकासाठीच तो महत्वाचा आहे. कित्येकदा अनेकजण आपल्या सोयीसाठी मोबाईलमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करत असतात. या गोष्टी जर अन्य कोणाच्या हाती लागल्या तर ते महागात पडू शकतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत की, ‘या’ गोष्टी मोबाईलमध्ये चुकूनही सेव्ह करू नका.

बऱ्याचदा अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये आधारकार्ड नंबर, पॅन नंबर किंवा बँक अकाउंट नंबर सेव्ह करतात. गरज पडल्यास पटकन सोपे होईल या हेतूने हे सर्व नंबर सेव्ह केले जातात. मात्र हे महत्वाचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करण्याची चूक करू नका. कारण हे नंबर अन्य व्यक्तींच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

आजकाल प्रत्येकजण अनेक ठिकाणी पासवर्डचा वापर करतात. हे पासवर्ड कधी कधी लक्षात राहणं कठीण असतं. त्यामुळे बऱ्याचदा अनेकजण मोबाईलमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याचा सोपा मार्ग स्वीकारतात. मात्र तसे करू नका कारण मोबाईल चोरीला गेल्यास कोणीही व्यक्ती त्याचा गैरवापर करू शकते. विशेषत: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट आणि नेट बँकिंगचे पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करू नका.

आपण प्रत्येक क्षण आठवणीत राहवा यासाठी फोटो काढून ते सेव्ह करतो. मात्र वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत खासगी फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करू नका. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फोटो काढून ते सेव्ह करू नका. कारण त्याच्यावरचा तपशील इतर अन्य व्यक्तीला समजला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मोबाईलमध्ये अशा काही महत्वाच्या गोष्टी सेव्ह करताना थोडा विचार करा.

आपली प्रतिक्रिया द्या