ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊन नका,सचिनचा इशारावजा सल्ला

38

सामना ऑनलाईन, मुंबई

फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानात येणार आहे. सध्या हिंदुस्थानी संघाचं पारडं जड दिसत असलं तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला हलक्यात घेऊ नका असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदुस्थानी संघाला दिला आहे.

२३ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये मुकाबला सुरू होणार असून ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पुण्याजवळच्या गहुंजे इथल्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यावर येणापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दक्षिण अफ्रिकेकडून पराभव स्वीकाराला लागला आहे तर पाकिस्तानविरूद्ध त्यांना विजय मिळाला आहे. मात्र असं असलं तरी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ मजबूत असून त्याला कमजोर लेखू नका असं सचिनने म्हटलंय.

 

आपली प्रतिक्रिया द्या