मुलांना नक्की आवडेल असा ‘डोसा पिझ्झा’

281

neelima-borse>> शेफ नीलिमा बोरसे

मुलांना चटपटीत खायला कायमच आवडतं. त्यात टीव्हीवर झळकणाऱ्या जाहिराती त्यांची चव आणखीनच बदलवून टाकतात. जसे की पिझ्झा-बर्गरच्या जाहिरातीपाहून मुलं सातत्यानं त्याच गोष्टींची मागणी करतात. एखादेवेळी पिझ्झा ठिक आहे पण सारखं असं खाणं हे शरीरासाठी फायदेशीर ठरणार नाही. म्हणून मी डोसा पिझ्झा बनवायला सुरुवात केली. तिच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. करून पाहा आणि कसा वाटला पदार्थ ते कळवायला विसरू नका.

साहित्य:-

पिझ्झा बेस तयार करण्यासाठी डोसा पीठ

टोमॅटो, कांदा, शिमला मिरची
हिरव्या मिरच्या – २
शिमला मिरची – २
छोटे गाजर – २
टोमॅटो- १
कांदा -१
चीज
टोमॅटो सॉस

प्राथमिक तयारी:-

प्रथम एक जाड असा डोसा करून घ्या. एक हिरवी मिरची, एक शिमला मिरची (बारिक कापलेली), किसलेले गाजर, थोडा बारिक कापलेला कांदा, हे सर्व गरम कढईत टाकून १ मिनिट परतवा. त्यात थोडे मिठ टाका.

मुख्य कृती:-

१) आता आपण आधीच तयार करून घेतलेला पिझ्झा बेस (जाड डोसा) घ्या. त्याला एका बाजून टोमॅटो सॉस लावा.
२) त्यात बारिक परतवलेल्या भाज्या पसरवा आणि त्यावर चीज किसू टाका.
३) यानंतर गोल चिरलेला कांदा, त्यावर गोल चिरलेली शिमला मिरची, त्यावर गोल चिरलेला टोमॅटो असे तीन थर व्यवस्थित सजवा.
४) पुन्हा एकदा त्यावर चीज किसून टाका.
५) आता पिझ्झा ओव्हनमध्ये किंवा तव्यावर ठेवा. झाकण व्यवस्थित लावा. १० मिनिटासाठी कमी आचेवर गरम करा.
६) त्यानंतर गरमागरम पिझ्झावर टोमॅटो सॉस पसरवा आणि सर्व्ह करा.

टीप: यात जाड डोसा ऐवजी कोणत्याही प्रकारचे थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरले तरी चालेल.

पदार्थ करून पाहा? कसा वाटला ते कळवा. आपल्या प्रतिक्रिया, सूचनांचं स्वागत आहे. नक्की कळवा. ई-मेल ([email protected])

फोन क्रमांक: ८३९०३१९०७९

आपली प्रतिक्रिया द्या