दोन शहरं, दोन खून; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बॉडीबिल्डरला अटक

4270

हरियाणातील रेवाडी येथे एका तरुणीचा मर्डर… यानंतर राजस्थानमध्ये एका कॅब ड्रायव्हरचा मर्डर… या दोन्ही हत्यांचा संबंध थेट दिल्लीशी… दोन शहरांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या खुनांचा संबंध दिल्लीशी कसा? आणि 2 हत्यामध्ये काय संबंध? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या हत्यांप्रकरणी पोलिसांनी जेव्हा दिल्लीतील एका नॅशनल अवॉर्ड जिंकणाऱ्या हेमंत लांबा नावाच्या बॉडीबिल्डरला अटक केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शुक्रवार 7 डिसेंबरला हरयाणातील रेवाडी येथे एका तरुणीचा (22) मृतदेह आढळला होता. ही तरुणी दिल्लीतील रोहिणी भागातील रहिवासी होती. चार गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली तेव्हा ती मूळची राजस्थानमधील हनुमानगडची रहिवासी असल्याचे समोर आले, परंतु गेल्या काही काळापासून वडिलांसोबत दिल्लीतील एका नातेवाईकाकडे राहायला गेली होती. पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे सिद्ध झाले. यानंतर तिच्या वडिलांनी ज्या लोकांवर संशय व्यक्त केला त्यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांनी ठरवले.

तपासामध्ये मृत तरुणीचे बॉडीबिल्डर आणि फिटनेस एक्सपर्ट हेमंत लांबा याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दक्षिण दिल्लीत राहणारा हेमंत लांबा याने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे. पोलीस तपासामध्ये 7 डिसेंबरला हेमंत लांबा (27) तरुणीसोबत एका कॅबने बाहेर गेल्याचे समोर आले. ही कॅब तरुणीने आपल्या मोबाईल नंबरवून जयपूरसाठी बूक केली होती. या कॅबचा मालक आणि चालक देवंद्र नावाचा व्यक्ती होती.

गाडी जयपूरकडे सरकत असताना दोघांमध्ये तरुणी आणि आरोपी हेमंतमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून वाद सुरू झाला. हेमंतने धारूहेडा येथे रामनगर जवळ तरुणीवर चार गोळ्या फायर केल्या आणि तिची हत्या केली. यानंतर मृतदेह तिथेच फेकून तो कॅब ड्रायव्हरसह निघून गेला. कॅब ड्रायव्हर देवेंद्रने डोळ्यादेखत मर्डर पाहिल्याने तो घाबरून गेला. परंतु आरोपी हेमंतने त्याला बंदुकीचा धाक दाखवून गाडी जयपूरला नेण्यास सांगितले. ड्रायव्हर कधीही या मर्डरचे रहस्य उघड करू शकतो म्हणून त्याने त्याचाही खून केला आणि फरार झाला.

दोन मर्डर केल्यानंतर आरोपी गुजरातमधील बलसाड येथे गेला आणि डिलरशी संपर्क करून कॅबचा सौदा केला. डिलरला संशय आल्याने त्याने कॅबवर लिहिलेल्या मालकाच्या नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन त्याच्या पत्नीने उचलला. तेव्हा पत्नी पतीचा मर्डर झाल्याचे सांगितले आणि हा तोच हत्यारा असावा अशी शक्यता व्यक्त केली. यानंतर डिलरने पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीला त्यांच्या हवाली केले. गुजरात पोलिसांनी याची माहिती रेवाडी पोलिसांनी दिली आणि रेवाडी पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला.

सध्या आरोपीला 14 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलीस रिमांडदरम्यान हेमंत लांबा याने प्रेयसीची हत्या का केली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या