५ लाख रूपयांसाठी विवाहितेस मारहाण करून हाकलून दिले

गाडी घेण्यासाठी माहेरवरुन ५ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी विवाहितेस मारहाण करून तिच्या जवळील सोने काढून घेऊन घरातून हाकलून दिले. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुनिता अविनाश खोत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १ मे २०१६ रोजी अविनाश भगवान खोत रा. झरी ता. निलंगा याच्याशी तिचे लग्न झाले. लग्नामध्ये तीन तोळे सोने, एक लाख रुपये हुंडा दिलेला होता. मात्र लग्नात आमची हौस पाहिजे तशी पूर्ण केली गेली नाही, आपला मानपान केला गेला नाही म्हणून तिचा छळ करण्यास सुरुवात झाली. चारचाकी गाडी घेण्यासाठी व शेत सोडवण्यासाठी माहेराहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा छळ केला जात होता.

मंगळवारी अविनाश भगवान खोत, भगवान पिराजी खोत, पिराजी मारोती खोत, विजयमाला भगवान खोत, राणी उर्फ अमृता गणेश गायकवाड, दिपाजी अमोल टोंपे यांनी पैशांसाठी छळ करुन फिर्यादी सुनिता हिच्या अंगावरील सोने काढून तिला घरातून हाकलून दिले. शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या