डॉ. अनमोल सोनवणे ‘युथ आयकॉन’;‘टॅव्ही’ हृदय शस्त्रक्रियेतून दिले शेकडो रुग्णांना जीवदान

मुंबईतील ब्रीच कॅण्डी आणि जसलोक रुग्णालयातील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल सोनवणे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर ‘टॅव्ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे. टॅव्ही आणि टॅव्हर हृदय शस्त्रक्रियेतील देशातील आघाडीचे तज्ञ म्हणून डॉ. अनमोल सोनवणे यांचे नाव घेतले जाते.

अनेक हृदयरोग रुग्णांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होऊ लागल्याने हृदय कमकुवत होऊ लागते. हृदय निम्म्या क्षमतेने रक्त पुरवण्याचे काम करू लागते. अशा रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी करणे धोकादायक ठरू शकते. अशात सध्या टॅव्ही आणि टॅव्हर शस्त्रक्रिया वरदान ठरत आहे. अशा आजारात ओपन हार्ट सर्जरी न करता टॅव्ही व टॅव्हर तंत्रज्ञानातून हृदयाच्या झडपांचे (व्हॉल्व्ह बदलाचे) उपचार करता येतात. त्या तंत्रज्ञानात डॉ. अनमोल सोनवणे हे निष्णात मानले जातात. त्यांनी देशातील 14 राज्यांतील 32 शहरांमधील 105 सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत तसेच जगभरातील 22 देशांत शेकडो टॅव्ही व टॅव्हर शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. याच कार्यासाठी त्यांना ‘दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’तर्फे युथ आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले.

एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे हृदयाची झडप अपुंचन पावणे. एओर्टिक व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे रक्तपुरवठा सुरळीत केला जातो, पण हा प्रवाह कमकुवत होऊ लागल्याने रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशावेळी रुग्णामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळय़ासमोर अंधारी येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. अतिशय गंभीर स्वरूपाच्या सिम्टमॅटिक एऑर्टिक स्टेनोसिसमध्ये औषधांचाही उपयोग होत नाही. त्यामुळे केवळ औषधांनीच उपचार करणे जिवाला धोकादायक होते. अशावेळी ट्रान्स- पॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टॅव्ही) शस्त्रक्रिया वरदान ठरते. शस्त्रक्रियेत कमकुवत झालेली झडप हायड्रा ट्रान्सक@थेटर एऑर्टिक व्हॉल्व्हच्या पद्धतीने यशस्वीपणे दुरुस्त केली जाते. टॅव्हीच्या माध्यमातून एऑर्टिक स्टेनॉसिसमुळे त्रस्त रुग्णांना नवी दिशा डॉ. अनमोल सोनवणे यांनी दाखविली आहे.

अशी होते टॅव्ही शस्त्रक्रिया…

टॅव्हीच्या 99 टक्के प्रकरणांमध्ये जांघेतून उपचार केले जातात. ही शस्त्रक्रिया करताना केवळ तोच भाग बधीर केला जातो. संपूर्ण कालावधीत रुग्ण संपूर्ण शुद्धीत असतो. परिणामी, अगदी थोडा वेळ आयसीयूत राहून रुग्णाला रुग्णालयातून लवकर घरी जाता येते. टॅव्ही प्रक्रियेत पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून एक झडप हृदयातील जुन्या झडपेवर बसवली जाते. ही झडप पेशींपासून तयार केलेली असल्यामुळे रक्त पातळ करण्याची औषधे काही महिनेच द्यावी लागतात, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.