डॉ. अब्दुल कलाम मुसलमान नव्हते! मुस्लिम नेत्याचे वक्तव्य

33

सामना ऑनलाईन, रामेश्वरम

डॉ. अब्दुल कलाम मूर्तिपूजा करत होते. तसेच हिंदूधर्मींयांचे गुरू आणि नागा साधूचांही ते आशीर्वाद घेत होते असे सांगतानाच, कलाम मुसलमान नव्हतेच असे खळबळजनक वक्तव्य करून तामीळनाडूतील तौहीद जमातच्या जैनुलबुद्दीन यांनी आज नवा वाद पेटवला.

कलाम यांच्या स्मारकात गीतेचे श्लोक असण्यात काहीही वावगे नाही; मात्र तेथे पवित्र कुराण ठेवू नये असेही त्यांनी बजावले. कलाम हे देशातील इतर वैज्ञानिकांपैकी एक होते; पण मूर्तिपूजा मान्य असल्यामुळे भाजप आणि संघ परिवाराने त्यांना मोठे केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रामेश्वरम येथील कलाम यांच्या स्मारकात त्यांच्या मूर्तीशेजारी भगवद्गीतेतील श्लोक कोरण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त विधान करत नव्या वादाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या