चंद्रपूर – डॉ. अशोक जीवतोडे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गंज, ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती.

मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे प्रा. डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित चेहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. अशोक जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे. विदर्भात व संपूर्ण देशात ओबीसी मंत्री असलेल्या चंद्रपुरातून एक कोहिनूर शरद पवारांनी राष्ट्रवादित खेचुन आनल्याने भाजपलामोठा धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या