रत्नागिरीत स्थापणार डॉ. कलाम कल्पकता केंद्र

20
देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती. कलामांचे विचार आजही देशातील नागरिकांना प्रेरणा देतात.

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावे यासाठी ठाणे येथील सिटी लॅब इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून रत्नागिरी शहरात डॉ.अब्दुल कलाम कल्पकता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना रोबोटिक या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

२१व्या शतकात वावरताना विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी छंद असावेत या विचाराने प्रेरित होऊन सिटी लॅब इंडिया काम करत आहे. सिटी लॅब इंडियाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोबोटिक या विषयाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी रत्नागिरीमध्ये डॉ.अब्दुल कलाम कल्पकता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या