पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमल

68

सामना ऑनलाईन । पनवेल

पनवेल महापालिकचे पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर आज भाजपच्या डॉ. कविता चौतमल या महापौरपदावर विराजमान झाल्या. डॉ. चौतमल यांची बिनविरोध निवड झाली.

महापालिका स्थापन करण्यात आल्यानंतर पनवेलची ही पहिलीच निवडणूक होती. यामध्ये जोरदार बाजी मारत भाजपने ७८ पैकी ५१ जागावंर विजय मिळवला. तर भाजपच्या चारुशीला घरत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवड प्रक्रियेत एकूण १६ सदस्यांची नेमणूक केली जाणार होती त्यात भाजपचे १० सदस्य तर आघाडीचे ६ सदस्य स्थायी समितीवर असतील. त्यात आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपकडून परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी बेरा, गोपीनाथ भगत, अमर पाटील, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपीळे तर आघाडीतून प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहकर, हरीश केणी, गोपाळ भगत, भारती चौधरी, सतीश पाटील निवडले गेले.

आपली प्रतिक्रिया द्या