व्हर्जिनियात गणेशोत्सवाचा उत्साह, डॉ. खांडगे कुटुंबीय 15 वर्षांपासून जपताहेत परंपरा

गणपती बाप्पा मोरया हा जयघोष आता महाराष्ट्र किंवा हिंदुस्थान पुरता मर्यादित राहिलेला नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. अनिवासी भारतीय भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात लाडक्या गणेशाचं पूजन करतात. यामध्ये मराठी कुटुंब आघाडीवर आहेत. अमेरिकेत राहणारे डॉ. चेतन प्रकाश खांडगे यांच्या घरातील गणेशोत्सव परंपरा कायम आहे.


View this post on Instagram

गणपती बाप्पा मोरया

A post shared by Dainik Saamana (@saamanaonline) on

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील रिचमंड शहरात गेली पंधरा वर्षे डॉ. चेतन प्रकाश खांडगे आणि सौ. डॉ. माधवी धुरी खांडगे यांच्या घरी गणपतीचं आगमन होतं. शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन व मोदक पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या भागातील गणेशभक्त त्यांच्या घरी आवर्जून दर्शन घेण्यासाठी येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सजावटीसाठी पौराणिक संदर्भ घेऊन चालता बोलता देखावा साकारला जातो. यंदा मारिच वध आणि सीता हरणाचा देखावा साकारला आहे. यासाठी तांत्रिक मदत नितिन व अपर्णा यांनी केली आहे. तर माहिती पटाचे लेखन निखिल खैरे यांनी केले व माहितीपटासाठी अपूर्व साठे यांनी आवाज दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या