७५ वर्षांनंतर डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा चीन करणार पुन्हा सन्मान

सामना ऑनलाईन । बीजिंग

७५ वर्षांनंतर चीन पुन्हा एकदा  डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती जागवून त्यांचा सन्मान करणार आहे. पहिल्या महायुध्दात जखमी चीनी सैनिकांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या हिंदुस्थानच्या या सेवाभावी आणि त्यागी डॉक्टरांची चीनी जनतेने चीनचा ‘सच्चा मित्र’ म्हणून निवड केली आहे.

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले होते.त्यावेळी चीनने पंडित नेहरूंना पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली होती. १सप्टेंबर १९३८ मध्ये ५ डॉक्टरांचे पथक चीनला रवाना झाले. त्यात डॉ.कोटणीस होते. त्यांनी चीनी सैन्याची  मनोभावे सेवा केली. ते चीनमध्ये स्थायिक झाले. चीनी नर्सबरोबर त्यांनी विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र ते अल्पायुषी ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर चीनने राष्ट्रीय दुखवटा पाळला.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारकही बांधण्यात आले आहे. आता ७५ वर्षांनी पुन्हा एकदा डॉ. कोटणीसांच्या स्मृती जागविण्यात येणार आहेत.

Attachments area