डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी 1200 पानी आरोपपत्र

30
nair

सामना प्रतिनिधी । मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्र्रकरणी अटक करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांविरुद्ध मुंबईतील गुन्हे शाखेने आज तब्बल 1204 पानी आरोपपत्र दाखल केले. मुंबई सत्र न्यायालयातील स्पेशल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रांसोबत डॉ. पायल तडवी हिने स्वतः लिहिलेल्या सुसाइड नोटसह एकूण 274 साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रतीही जोडण्यात आलेल्या आहेत.

जामीन अर्जावर हायकोर्टात उद्या सुनावणी

नायर रुग्णालयातील डॉ. पायल हिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली आहे. रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या तिघींजणी तुरुंगात असून त्यांनी आपल्या सुटकेसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र या प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्प्यात आल्याने आरोपी डॉक्टरांना जामीन देणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने सत्र न्यायालयात घेतल्याने न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आपली सुटका व्हावी यासाठी या तिघींनी आता हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांच्यासमोर याप्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या