‘लोभस’ व्यक्तिचित्रे

95

अरविंद दोडे

एखादा लेखक जेव्हा आपल्या वैचारिक अवकाशात आसमंत आणि काही व्यक्तींची चित्रे रेखाटतो तेव्हा त्या रेखाटनांना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कौटुंबिक संदर्भांचा मजबूत पाया लाभतो. आपला गाव अन् तेथील महान व्यक्तींचा परिचय किती ‘लोभस’वाणा असू शकतो त्याचा प्रत्यय या पुस्तकातून येतो.

लोभस एक गाव, काही माणसं’ हे पुस्तक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांचे असून ‘मराठवाडी-बाज’ कसा दिलखुलास आणि किती प्रतिभासंपन्न आहे याची प्रचीती येते. संभाजीनगरचा इतिहास सांगताना रसाळांनी निजामी कारभारापासून सुरू झालेल्या ‘मोगलाई’चा आढावा अत्यंत रसाळ भाषेत घेतला आहे तर आगरकरी वळणाचे त्यांचे वडील (भाऊ), गुरू आणि स्नेही असलेले भगवंतराव देशमुख, ग्रीक परंपरेतले शिक्षक म. भि. चिटणीस, आधुनिक वारकरी अनंतराव भालेराव, साहित्याचे पहिले प्राध्यापक वा. ल. कुलकर्णी, विधायक वृत्तीचा विधायक मित्र न्या. नरेंद्र चपळगावकर (नाना) आणि नवनीतमृदू आणि वज्रकठोर मित्र गो. मा. पवार यांचा केवळ परिचयच नाही तर नात्यांचे उभे-आडवे धागे गुंफताना रसाळांची लोकसंग्राहतेची अनमोल आस फारच प्रेरणादायी आहे. गुरू-शिष्यांचे संबंध काय किंवा मित्रमंडळींतील निःस्वार्थपणे संबंध टिकविण्याचे प्रयत्न तितकेच सहज, साधे, सरळ पण असामान्य आहेत. माणसे जोडताना स्वतःला घडवता येते हेच खरे!

लोभस

लेखक.. डॉ. सुधीर रसाळ

प्रकाशक..राजहंस प्रकाशन, पुणे-30

पृष्ठ..१७६, मूल्य..२००/- रुपये

 

आपली प्रतिक्रिया द्या