डॉ. लहाडे पोलिसांना शरण, दोन मेपर्यंत कोठडी

सामना ऑनलाईन, नाशिक

जिल्हा शासकीय रुग्णालयातील निलंबित स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा लहाडे आज सरकारवाडा पोलिसांसमोर शरण आल्या, त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

जिल्हा रुग्णालयातील अवैध गर्भपातप्रकरणी स्त्रीरोग तज्ञ डॉ. लहाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय व्यवसाय करण्याचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार केले, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपाताची औषधे ठेवल्याप्रकरणी म्हसरुळ येथे, तर गर्भपातप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, काल त्यांनी तो अर्ज मागे घेतला. आज सकाळी १० वाजता त्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या