
प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि स्त्राीरोगतज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना ‘आत्रेय’च्या वतीने देण्यात येणारा ‘शिरीष पै जीवनगौरव’ आणि ‘मानचिन्ह 2025’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम वनिता समाज, दादर येथे शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि विधिज्ञ राजेंद्र पै यांची प्रमुख उपस्थिती आहे. रसिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल प्रकाशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
























































