मलनिस्सारण वाहिन्या फोडणाऱ्या मोनो-मेट्रोकडून दुरुस्तीचा खर्च वसूल करणार!

bmc-2

‘मोनो-मेट्रो’च्या कामामुळे फुटणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी पालिकेला करावा लागणारा कोटय़वधीचा खर्च संबंधित प्राधिकरणांकडून वसूल करण्यात येणार आहे. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी या मलनिस्सारण वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात येत असली तरी पालिकेला पडलेल्या भुर्दंडाचा आढावा घेण्यात येत  असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोनो आणि मेट्रोमुळे मुंबईतील ड्रेनेज पाईप फुटले!

मुंबईकरांच्या सुविधेसाठी रस्ते, नाले, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईभरात सुरू असलेल्या मेट्रो-मोनो रेल्वेच्या कामांमुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे.

‘मोनो डार्लिंग’ने लटकवलं! वीज खंडित झाल्याने वाशी नाक्याजवळच अडकली

जलवाहिन्या फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार घडत आहेत तर मलनिस्सारण वाहिन्या फुटल्याने दूषित पाणी घरांत आणि रस्त्यावर येण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती करण्यास संबंधित यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे पालिकेलाच नव्या मलनिस्सारण वाहिन्या टाकणे किंवा दुरुस्त करण्याचे काम करावे लागत आहे. सध्या हे दुरुस्तीचे काम पालिकेकडून करण्यात येत असले तरी संबंधित ‘एमएमआरडीए’, ‘डीएमआरसी’कडून झालेला खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मेट्रोच्या कामगाराच्या हातातील पाना खाली पडल्याने कारचे नुकसान

 

पालिकेला मलनिस्सारण वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी एकूण 73 कोटी 98 लाखांचा खर्च येणार असून यातील काही कोटींचा खर्च मोनो-मेट्रो रेल्वेच्या कामात फुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांवर करावा  लागणार आहे. या खर्चाचा आढावा पालिका प्रशासनाकडून घेतला जात आहे.

पालिका म्हणते

मोनो-मेट्रोच्या कामात फुटलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून करणे गरजेचे असते. काही ठिकाणी ही दुरुस्ती संबंधितांकडून करण्यातही येते. मात्र ज्या ठिकाणची दुरुस्ती संबंधित प्राधिकरणांकडून करणे शक्य नसते अशा ठिकाणी पालिकेला काम करण्याची विनंती करण्यात येते. त्यानुसार ही कामे करण्यात येत आहेत. मात्र या कामाचा खर्च ‘एमएमआरडीए’, ‘डीएमआरसी’कडून वसूल करण्यात येणार आहे.

जोगेश्वरीप्रकरणी उद्या पोलिसांत तक्रार

जोगेश्वरीत पोलीस ठाण्याजवळील मेट्रोच्या कामामुळे आठ घरांमध्ये फुटलेल्या मलनिस्सारण वाहिनेचे दूषित पाणी शिरत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या तीन कुटुंबांना स्वतःचे घर सोडून भाडय़ाच्या घरात राहावे लागत आहे. याबाबत संबंधित प्राधिकरणांकडे न्यायासाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद देण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांविरोधात जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दोन दिवसांत तक्रार दाखल करणार असल्याचे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या