‘सूप प्या…निरोगी राहा’… ‘हे’ आहेत पौष्टिक आणि चवदार सूप…

उत्तम आरोग्याकरिता सूप पिणे फायदेशीर ठरते. सूपमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, अँण्टी ऑक्सीडंट आणि मॅग्नेशियम हे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे सर्दी, ताप, घसा खवखवणे अशा अनेक आजारांपासून बचाव होतो. शिवाय वजन कमी करण्यासाठी सूप पिणे लाभदायक ठरते. पचायला हलका आणि शरीराकरिता गुणकारी असलेल्या सूपचा समावेश आहारात केला तर रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते.

भोपळा, लसूण सूप – पचनास हलका आणि पोटाला आराम मिळेल असा सूपचा प्रकार म्हणजे भोपळा, लसूण सूप. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. या सूपमध्ये हळद आणि लसणाचा वापर केला जातो. या सूपमध्ये असलेल्या अँण्टी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते.

हिरव्या पालेभाज्यांचे सूप- हिरव्या पालेभाज्यांपासून तयार केलेल्या सूपमध्ये जीवनसत्त्व ए, सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. फायबर आणि मिनरलचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे हे सूप अतिशय पौष्टिक असून यामध्ये कॅलरी कमी असतात. यामध्ये पालक आणि ब्रोकोली या भाज्यांचा समावेश केला तर वजन कमी व्हायला मदत होते.

चिकन सूप – आजारी असल्यास या सूपचा फायदा होतो. यामुळे सर्दी, घसा खवखवणे असे त्रास दूर व्हायला मदत होते. चिकन सूपमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. यामुळेही वजन कमी होते. चिकन सूप तयार करण्यासाठी आले, लसूण वापरले जाते. त्याचा शरीराला फायदा होतो. सर्दी आणि तापामुळे थकवा जाणवत असल्यास चिकन सूप घेतल्यावर अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या