दररोज गरम चहा प्यायल्याने काचबिंदूचा धोका कमी होतो

6
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । वॉशिंगटन

चहाप्रेमींसाठी एक खुशखबर आहे. चहाप्रेमींना आता आणखी एक कप जास्त गरम चहा पिण्यासाठी कारण मिळणार आहे. दररोज गरम चहा पिल्याने काचबिंदूचा धोका कमी होत असल्याचे संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, चहामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, प्रक्षोभक आणि न्यूरोप्रोटक्टेक रसायने असतात, ज्यामध्ये हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो. काचबिंदू डोळ्यातील द्रव दाब वाढवण्यास कारणीभूत ठरते, या द्रवदाबामुळे डोळ्यातील मज्जातंतूंना नुकसान पोहचते, आणि हे एक आंधळेपणाचे प्रमुख कारण आहे.

या सर्वेक्षण करणाऱ्या गटाने २००५-२००६ या वर्षात अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण सर्वेक्षणाच्या आकडेवारीची माहिती घेतली. राष्ट्रीय पातळीवरील वार्षिक सर्वेक्षणातून अमेरिकेतील जवळपास दहा हजार प्रौढ आणि लहान मुलांच्या आरोग्य आणि पौष्टिकतेच्या दृष्टीने त्यांच्या मुलाखती, शारीरिक चाचण्या, रक्त गटाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १,६७८ लोक सहभागी झाले होते, त्यांच्या डोळ्यांची संपूर्ण चाचणी करण्यात आली होती.

मागील १२ महिन्यांतील प्रमाणित प्रश्नावलीनुसार सहभागी झालेल्या लोकांना किती वेळा शीतपेय, आईस टी सह कॅफिनेटेड आणि डिकॅफिनेटेड पिय पितात असे विचारण्यात आले. त्यानंतर अभ्यासकांनी दररोज गरम चहा पिणारे आणि दररोज गरम चहा न पिणारे या दोन गटांतील लोकांची तुलना केली. यातून जे दररोज गरम चहा पित होते त्यांना काचबिंदूचा दोष कमी असल्याचे आढळून आले. या निष्कर्षांनुसार हे स्पष्ट होते की डिकॅफेनेटेड आणि कॅफेनेटेड कॉफी पिणे, डिकॅफ्टीनेटेड चहा, आइस टी आणि शीतपिये पिल्याने काचबिंदूचा धोका असल्याचे दिसत नाही. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅमॉलॉजी मध्ये हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.