यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या सलीमला २ लाखांचे बक्षीस

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या सलीम शेख या ड्रायव्हरला जम्मू-कश्मीर सरकारतर्फे २ लाखांचे बक्षीस जाहीर झालं आहे. ज्या बसवर हा हल्ला झाला त्या बसचा ड्रायव्हर सलीम याने प्रसंगावधान राखत बस न थांबवल्यामुळे अनेकांचे जीव वाचले.

”हा हल्ला झाला तेव्हा बहुतांश यात्रेकरू झोपेत होते. गोळीबाराचा आवाज येताच त्यांना आधी फटाके फुटल्यासारखं वाटलं. पण, काही सेकंदांनंतर त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. पण तोपर्यंत मी बसचा वेग वाढवला होता”, असं सलीम याचं म्हणणं आहे. बसचा वेग वाढवून सलीमने बस पुढे नेली आणि सुरक्षित ठिकाणी थांबवली. त्यामुळे अनेक यात्रेकरूंचे प्राण वाचले.

दरम्यान या आधी पोलिसांनी ड्रायव्हरवर संशय व्यक्त केलेला होता. मात्र, तपासाअंती त्याचं म्हणणं खरं असल्याचं समोर आल्याने त्याला बक्षीस जाहीर करण्यात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या