कर्नाळा खिंडीतील तिहेरी अपघातात अल्टो चालक जागीच ठार, 2 जण जखमी

23

सामना प्रतिनिधी । गुहागर

मुंबई- गोवा मार्गावर पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत आज पहाटे भीषण असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात गुहागर तालुक्यातील अल्टो चालक जागीच ठार झाला आहे. तर इनोव्हामधील 2 जण जखमी झाले आहेत.

अपघात झालेल्या एमएच ४३ एएफ २२२९ या अल्टो गाडीतून काल रात्री गुहागर तालुक्यातील झोंबडी गावातील गोणबरे कुटुंब डोंबिवलीला गेले होते. ते पहाटे 4 वाजता पोहचले. त्यांना सोडून रझफ्फ ममतुले हा चालक पुन्हा आपल्या गावी येत असतांना हा अपघात झाला. या तिहेरी अपघातात टँकरने अल्टो गाडीला धडक दिली तर अल्टो गाडीने इनोव्हा धडक दिली मात्र हा अपघात इतका भीषण होता की यात अल्टो गाडीचा चक्काचूर झाला आहे.

रझफ्फ ममतुले (26) हा गाडी चालक असून त्याला 2 वर्षाची मुलगी व 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या या अपघाताच्या बातमीने झोंबडी गावावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या