108 रुग्णवाहिका चालक संपावर, रायगड जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र निर्धास्त

965

अत्यावश्यक रुग्णाला तातडीने उपचारासाठी रुगणालाय नेण्यासाठी सुविधा मिळावी यासाठी 108 ही कंत्राटी अत्यावश्यक रुग्णवाहिका शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र कंत्राटी कंपनीने 108 वरील पायलट चालकांच्या पगारात अनिश्चितीता व घट हे धोरण स्वीकारल्याने रायगड जिल्ह्यातील 22 पायलट चालकांनी संप पुकारून आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीच पावले उचलली गेली नसल्याने अत्यावश्यक सामान्य रुग्णाचे हाल झाले आहेत. जिल्हा रुग्णालय परिसरात 108 रुग्णवाहिका लावून चालकांनी संप पुकारला आहे.

एखाद्या व्यक्तीला मोठा अपघात वा हृदयविकाराचा झटका आल्यास 108 या अत्यावश्यक नंबरवर फोन केल्यास त्वरित रुग्णवाहिका दाखल होऊन रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णासह इतरांनाही या अत्यावश्यक सेवेचा लाभ फायदेशीर ठरत आहे. राज्यात बीवीजी या कंपनीला 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकेचा ठेका दिला आहे. राज्यात 937 रुग्णवाहिका असून सडे चार हजार पायलट चालक काम करीत आहेत. यामध्ये जिल्हयात 22 अत्यावश्यक 108 रुग्णवाहिका आहेत.

108 रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगार कपात, रुग्णवाहिकेची दुरुस्ती करणेबाबत, पगार वाढ, गाडी चालवताना फोन न उचलणे, कॉलवर असताना दुसरा कॉल जबरदस्तीने देणे, ,लॉंग डिस्टन्स कॉल जबरदस्ती देणे, दुसऱ्या जिल्हयातील कॉल जबरदस्ती देणे, डिप क्लिनिंग बंद केल्याबाबत, टायर स्टेपनी, जॅक रुग्ण वाहिकेत नसणेबाबत या मागण्या आहेत.

कंपनीच्या अडमुठे धोरणामुळे चालकांनी काळ्या फिती लावून कंपनीचा निषेध करून संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे अत्यावश्यक रुग्णाचे मात्र हाल होणार आहेत. तर या संपामुळे जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्याशी संपर्क साधला असता चालकाशी चर्चा करून त्यातून पुढची दिशा ठरवू असे उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या