वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया क्षेत्ररक्षणाचा ‘बाप’, पाकिस्तानने सोडल्या पुंगळ्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये रविवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये लढत रंगली. या लढतीत पाकिस्तानने विजय मिळवला असला तरी त्यांच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचीच जास्त चर्चा झाली. या लढतीत पाकिस्तानने तब्बल पाच झेल सोडले. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने देखील खेळाडूंच्या या कामगिरीवर आसूड ओढले आहेच. वर्ल्डकप 2019 मध्ये आतापर्यंत पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी 14 झेल सोडले आहे. याबाबतीत टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनी मात्र बाजी मारली आहे.

वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 1 झेल टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनी सोडला आहे. तर पाकिस्तानने 14 झेल सोडले आहे. पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेशची कामगिरी उजवी झाली आहे. अफगाणिस्तानने फक्त 2 झेल सोडले, तर श्रीलंकने 3, बांग्लादेशने 4, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने 6 झेल सोडले आहे. पाकिस्तानसोबत वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार यजमान इंग्लंडचा संघही गचाळ क्षेत्ररक्षणात आघाडीवर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 12 झेल सोडले आहेत.

> कोणत्या संघाने किती कॅच पकडले आणि सोडले

  • हिंदुस्थानने 15 कॅच पकडले, तर फक्त 1 सोडला
  • वेस्ट इंडीजने 27 कॅच पकडले आणि 3 सोडले
  • अफगाणिस्तानने 18 कॅच पकडले व 2 सोडले
  • श्रीलंकने 15 कॅच पकडले आणि 3 सोडले
  • बांग्लादेशने 24 कॅचपकडले व 4 सोडले
  • ऑस्ट्रेलियाने 35 कॅच पकडले आणि 6 सोडले
  • न्यूझीलंडने 33 कॅच पकडले आणि 6 सोडले
  • दक्षिण आफ्रिकेने 31 कॅच पकडले आमि 7 सोडले
  • इंग्लंडने 42 कॅच पकडले आणि 12 सोडले
  • पाकिस्तानने 26 कॅच पकडले व 14 सोडले